रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रतिनिधी
अवनि संस्था ही गेल्या 26 वर्षांपासून वंचित, निराधार, गरीब गरजू, विटभट्टीवरील मुले, बालकामगार, बालभीक्षेकरी मुलांच्या व महिलांच्या अधिकारावर काम करणारी सेवाभावी संस्था आहे. अशा भयावह परिस्थिती अवनी संस्थेने तृतीयपंथी घटकांनी अन्नधान्याचे किट वाटप करून सामाजिक संवेदनशीलता दाखवून दिली.
सध्या, कोव्हीडजन्य परिस्थितीमध्ये सर्वत्र ठिकाणी लॉकडाऊन असल्याने अनेकांचे रोजगार बुडाले तसेच होतकरू व गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली त्यामध्ये तृतीयपंथीयांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली. अशा परिस्थितीत अवनि संस्थेमार्फत इचलकरंजी, हुपरी व हातकणंगले येथील 100 तृतीयपंथीयांना गुरुवार दि. 15 जुलै रोजी कोव्हीडच्या कठीण काळात अवनि संस्थेकडून जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. जीवनावश्यक किट मध्ये साखर, चहापूड, तूरडाळ, मूगडाळ, रवा, पोहे, शेंगदाणे, चटणी, हळदपूड, हरभरा, मीठ, तेल इ. साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बालकल्याण समिती सदस्य व तृतीयपंथी राज्य कल्याणकारी महामंडळ सदस्य दिलशाद मुजावर उपस्थित होते. अवनि संस्थेचे कार्यकर्ते : साताप्पा मोहिते, अमर कांबळे, इम्रान शेख, प्रमोद पाटील यांनी किट वाटपासाठी परिश्रम घेतले. यासाठी अजीम प्रेमजी फौंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.
अवनी संस्थेचा या विशेष उपक्रमामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा