![]() |
संग्रहित |
आर्थिक फसवणुकीसाठी सर्वसामान्यांचे स्मार्टफोन्स हॅक होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही टिप्सद्वारे तुम्ही तुमचा फोन देखील हॅक झाला नाही ना, हे पाहू शकता.
भारतात स्मार्टफोन हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हॅकर्स मोबाइल अॅप आणि वेबसाइटद्वारे प्रसिद्ध लोकच नाही तर सर्वसामान्यांना देखील निशाणा बनवत आहेत. मॅलेशियस अॅप आणि टूलच्या साहह्याने हॅकिंग केले जाते. मात्र, फोनमधील काही गोष्टींवर लक्ष ठेवून तुम्ही तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना हे पाहू शकता. फोन हॅक झाला आहे की नाही हे कसे ओळखाल ? याबाबत जाणून घेऊया.
1) फोनची बॅटरी वेगाने समाप्त होणे
जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी नेहमीच्या तुलनेत अधिक वेगाने समाप्त होत असेल तर फोनमध्ये मॅलवेअर अथवा बनावट अॅप असू शकते. निष्कर्षावर पोहचण्याआधी तुम्ही बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले अॅप देखील तपासून पाहावेत. अनेकदा बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेल्या अॅपमुळे देखील बॅटरी लवकर समाप्त होते. त्यामुळे हे अॅप बंद करावे व त्यानंतर पाहावे.
2) स्मार्टफोन स्लो होणे
जर तुमचा मोबाइल अचानक स्लो झाला असेल अथवा वारंवार हँग होत असल्यास डिव्हाइसच्या बॅकग्राउंडमध्ये मॅलवेअर असू शकते. त्यामुळे फोनला त्वरित फॅक्ट्री रीसेट करावे. यामुळे मॅलवेअर अॅप डिलीट होतील.
3) मोबाइल अॅप क्रॅश होणे
जर तुमच्या फोनमध्ये अॅप ओपन केल्यावर वारंवार क्रॅश( बंद होत असेल) होत असेल अथवा वेबसाइट लोड होण्यास नेहमी पेक्षा अधिक वेळ लागत असल्यास तुमचा फोन हॅक झाला असण्याची देखील शक्यता आहे.
4) पॉपअप आणि जाहिराती
अनेकदा आपण एखादा अॅप अथवा वेबसाइटवर गेल्यावर अचानक पॉपअप-जाहिरात दिसते. कदाचित तुमच्या फोनमध्ये मॅलवेअर असण्याची शक्यता आहे. यापासून वाचण्यासाठी थर्ड पार्टी अॅप वापरणे टाळावे. असे केल्यास तुमचा फोन आणि खासगी डेटा सुरक्षित राहिल.
5) फ्लॅश लाइट आपोआप सुरू होणे
तुम्ही मोबाइल वापरत नसताना देखील डिव्हाइसची फ्लॅश लाइट सुरू होत असल्यास कदाचित हॅकर तुमच्या फोनला कंट्रोल करत असण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा