![]() |
संग्रहित फोटो |
हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
मुसळधार कोसळण्याऱ्या पावसामुळे बारावी निकाल तयार करण्याचे काम रखडले आहे. बारावीच्या शिक्षकांना निकालाचे काम करण्यासाठी चार ते पाच दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणी शिक्षकांच्या वतीनं केली जात आहे. रात्र दिवस एक करून शिक्षकांचा बारावी निकाल तयार करण्याच्या कामासाठी कॉलेजमध्येच मुक्काम ठोकला आहे. यावर्षी बारावी परीक्षा रद्द करून अंतर्गत दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण एकत्र करून अंतर्गत मूल्यमापनद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निकाल तयार करण्याचे काम सुरु असताना मागील 3 ते 4 दिवसापासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असताना शिक्षकांना कॉलेजमध्ये येऊन निकाल पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय, बारावीच्या शिक्षकांना 23 जुलैपर्यंत मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्याची मुदत दिलेली आहे. परंतु, हा कालावधी अपुरा असल्यामुळे त्यांना चार ते पाच दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा