मुंबई: MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावरही पडल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५११ रिक्त पदांची MPSC कडून भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
ज्या ज्या विभागांनी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले, त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यानुसार, २०१८ पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत. यापैकी गट अ - ४४१७, गट ब - ८०३१, तर गट क - ३०६३ इतकी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली.
दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले
सरकारने खुप छान निर्णय घेतला आहे आता लवकरात लवकर अंमलबजावणी होउदे म्हणजे झाल.
उत्तर द्याहटवा