Breaking

मंगळवार, ६ जुलै, २०२१

अरे बापरे ❗मृत्यूची भविष्यवाणी करणारा कॅल्क्युलेटर बाजारात

 



मुंबई, 06 जुलै: मृत्यू हे शाश्वत सत्य मानलं जात. प्रत्येकाचा कधी ना कधी तरी मृत्यू अटळ आहे. कुणासाठी कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही किंवा त्याबाबत कुणी आधीच माहितीही ठेवू शकत नाही. मात्र येणाऱ्या काळात या बाबी चुकीच्या ठरवल्या जाऊ शकतात (Know Your Death Date). रिसर्चर्सनी अशी मशिन बनवल्याचा दावा केला आहेत की जे सांगले माणसाच्या मृत्यूची तारीख काय असेल (Death Prediction). मृत्यूची तारीख समजल्यामुळे त्या व्यक्तीकडे त्याचं उर्वरित आयुष्य सुखात घालवण्या पर्याय असेल.

      मृत्यूची तारीख सांगणारा हा कॅलक्यूलेटर बाजारात लाँच झाला आहे.या कॅलक्यूलेटरचं नाव Risk Evaluation for Support: Predictions for Elder-Life in the Community Tool (RESPECT) असं आहे. यामध्ये जगातील जवळपास प्रौढांचा डेटा समाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये त्यांचा जगण्याचा सरासरी कालावधी आणि त्यांच्या मृत्यूची तारीख कॅलक्यूलेट करण्यात येईल. हे डिव्हाइस पुढील चार आठवड्यात होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज देखील वर्तवेल.


अशाप्रकारे फीड झाला आहे डेटा


न्यूज18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, 2013 पासून या डिव्हाइसवर काम सुरू आहे. तेव्हापासून 2017 दरम्यान जवळपास पाच लाख लोकांनी त्यांची मेडिकल स्थिती, एकूण परिस्थिती याबाबतचा तपशील यामध्ये दिला आहे. यांची अशी परिस्थिती आहे पुढील पाच वर्षात त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या आधारे, संशोधकांनी पुढील तयारीसाठी मशिनरीवर काम केलं. लोकांनी त्यांच्या आरोग्यासंबंधीच्या धोक्यांविषयी तपशील दिले ज्यामध्ये त्यांना झालेल्या कोणत्याही स्ट्रोक किंवा कमकुवतपणाचा देखील उल्लेख केला होता. त्या आधारे हे ठरविले गेले की ती व्यक्ती आता किती वर्षे जगू शकेल.


ही आहेत मृत्यूची लक्षणं

   रिसर्चसना हे आढळून आलं की, आजारी पडल्यानंतर एखाद्या व्यक्तीची कमकुवत झालेली फिजिकल क्षमता याचा त्याच्या मृत्यूशी संबंध आहे. जर अचानक शरिराला सूज आली, वजन कमी झालं किंवा भूक कमी होत असेल तर ही मृत्यूची लक्षणं आहेत. या रिसर्चर्सच्या मते यांचा येणाऱ्या काळात मृत्यू होऊ शकतो.

       या उपकरणाबद्दल, कॅनडामधील ओटावा युनिव्हरसिटी आणि Bruy re Research Institute इनव्हेस्टिगेटर डॉ. एमी हसू यांनी सांगितले की लोकांना त्यांचा मृत्यू कधी होणार हे माहित असेल तर ते त्यांचा शेवटचा काळ कुटुंबासमवेत चांगल्या प्रकारे घालवू शकतील. ते सुट्टीवर जाऊ शकतील आणि आयुष्यभर त्याचा आनंद लुटू शकेल. हे संपूर्ण संशोधन जर्नल ऑफ कॅनेडियन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा