कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जपानची राजधानी टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. टोकियोमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी 12 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळं आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं ऑलिम्पिक खेळांचा आनंद प्रत्यक्ष मैदानावर जाऊन लुटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कोरोनामुळं पुढे ढकलली होती. आता ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार आहे.पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी काल म्हटलं होतं की, जगभरातील क्रीडापटूंचा समावेश असलेले ऑलिम्पिक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजनांसह सज्ज आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा