Breaking

गुरुवार, २९ जुलै, २०२१

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबरोबर शाश्वत शेतीच्या विकासासाठी तोडगा निघणे गरजेचे : संवेदनशील नेते शेखर पाटील

 

शेखर पाटील

शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी - रोहित जाधव


शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती गावाला ही पुराने वेढले असून गावाला पुराचा फटका बसला आहे. पण कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.पत्रकार रोहित जाधव यांनी गावच्या पुराचा आढावा घेताना गावचे नेते शेखर पाटील यांच्याशी बातचीत केली ते म्हणाले, गावच्या सेवेसाठी आम्ही कायम तत्पर आहोत.पूर्ण गाव पाण्याखाली आहे पण सर्वांची जेवणाची आणि राहण्याची सोय आम्ही गावच्या शाळेत केली आहे,रोज सकाळ संध्याकाळ नागरिकांना शिरा,भात,भाजी,आमटी अशी जेवणाची सोय केली आहे, रोजच्या रोज पाण्याच्या पातळीचा आढावा गावचे तलाठी,ग्रामसेवक,सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी घेत आहेत,नागरिकांसाठी औषध,गोळ्या देवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे,जनावरांसाठी चारा तसेच पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करून उत्तम पद्धतीने नागरिकांची काळजी घेतली जात आहे.पण नागरिकांचं म्हणणे आहे की,आम्हाला शासनाने दुसरीकडे जागा द्यावी पण पुनर्वसन हा पर्याय नाही,कारण दर वेळी पूर येणार आपण  घर बदलू पण शेती कशी बदलणार? शेती ही आहे तिथेच राहणार ,शिरोळ तालुका हा शेतीवर आधारित आहे,दर वर्षी शेतीचे पुराने नुकसान होणार आहे.त्यामुळे हे नुकसान भरून निघणारे नाही.

   शेखर पाटील यापुढे म्हणाले, शासनाने दर वेळी फक्त चर्चा न करता पुराच्या पाण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत,पुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवायला हवं तसेच शेतीच्या शाश्वत विकासासाठी कायमचा तोडगा काढणे आवश्यक आहे.आम्ही गावच्या सेवेसाठी कायम तत्पर आहोतच,नागरिकांच्या व्यथा आम्ही शासनापर्यंत पोहचवायच काम करू,असे प्रखर मत त्यांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा