Breaking

गुरुवार, २९ जुलै, २०२१

जवाहर सहकारी साखर कारखान्याकडून पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी चाऱ्याची सोय

 


अकिवाट प्रतिनिधी :  प्रा.अमोल सुंके


शिरोळ : पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी जवाहर साखर कारखाना पुन्हा एकदा धावून आला आहे अकिवाट माळ भागात अकिवाट, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, बस्तवाड, इत्यादी गावातील जवळपास 2 ते 3 हजार जनावरे आली आहेत त्यांच्या चाऱ्याची अडचण लक्षात घेऊन जवाहर सहकारी साखर कारखान्याने जनावरांच्या चाऱ्याची सोय केल्याचे कारखान्याचे संचालक संजय कोथळी यांनी सांगितले या भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता त्यामुळे जवळपास दोन एकर ऊस चाऱ्यासाठी देण्यात आले यामुळे कारखान्या बद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा