हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कॅबिनेट बैठकीदरम्यान प्रकृती बिघडली असून त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कॅबिनेटची बैठक सुरू असताना त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना बैठक अर्धवट सोडून रुग्णालयात नेण्यात आले. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तातडीनं ईसीजी करण्यात आलं असून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयंत पाटीलांसोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. माहिती मिळताच विद्या चव्हाण देखील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात आल्या आहेत.
दरम्यान ,जयंत पाटील यांनी ट्विटरवरून देखील प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा