Breaking

बुधवार, २८ जुलै, २०२१

*धक्कादायक ! इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केल्याने यावर्षी ६३ महाविद्यालये बंद*

 



हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी


यावर्षी अभियांत्रिकी प्रवेश संख्या कमी असून या दशकातील सर्वात  कमी संख्या झाली आहे.२०१५-१६ पासून अभियांत्रिकी कॉलेजेस बंद करण्यासाठी काही संस्था अर्ज करीत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात क्षमता कमी झाल्याने भारतातील एकूण अभियांत्रिकी शिक्षणातील एकूण जागा कमी झाल्या आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने याची आकडेवारी सादर केली आहे.

     इंजिनिअरिंगच्या पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये घट होऊन त्या आता २३.२८ लाखांवर आल्या आहेत. चालू वर्षी या जागांमध्ये खूपच घट झाली आहे. सध्या एकूण शिक्षणक्षेत्रातील ८०% जागा इंजिनिअरिंगच्या आहेत. पण यातील अनेक शिक्षणसंस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

   २०१४-१५ साली तंत्रशिक्षण परिषदेने शिक्षणसंस्थांमध्ये ३२ लाख जागांना मान्यता दिली होती. केवळ ७ वर्षांत या जागा जवळपास १० लाखांनी कमी झाल्या आहेत हे निराशाजनक आहे. यावर्षी संस्था बंद पडण्याचा आकडा सर्वांत जास्त आहे.

तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी तंत्रशिक्षण परिषदेने ५४ नवीन शिक्षणसंस्थांना मान्यता दिली आहे. नव्या शिक्षणसंस्थांना मान्यता देण्यात आलेले जिल्हे प्रामुख्याने मागास आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा