Breaking

बुधवार, २८ जुलै, २०२१

जयसिंगपूर येथील प्राथमिक शिक्षकांनी जपली दातृत्वाची परंपरा

 


मालोजीराव माने : कार्यकारी संपादक


     नामदार मा.डॉ.श्री.राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचे मार्गदर्शन:

  जयसिंगपूरस्थित प्राथमिक शिक्षक बंधु-भगिनीनी महापुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पूरग्रस्त झालेल्या उदगाव, धरणगुत्ती व मंगेशनगर कोथळी येथील बांधवांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी स्वयं प्रेरणेने .२००००/-₹ संकलित करून अन्नधान्याचे किट तयार करुन वाटप  केले. जेवणासाठी लागणारे सर्व साहित्याचे वाटप करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.

    उदात्त भावनेने व अभिमान वाटावा असा या शिक्षकांनी उदगाव, धरणगुत्ती  व मंगेशनगर  येथील पूरग्रस्त लोकांची दोन वेळच्या जेवण व नाष्ट्याची व्यवस्था केली.आपल्या या अन्नदानातून जयसिंगपूर येथील प्राथमिक शिक्षकांनी  दातृत्वाची परंपरा जपल्याबद्दल सदर भागातील पूरग्रस्त नागरिकाकडून सर्वांचे मनापासून आभार मानण्यात येत आहे. सदर कामास यड्रावकरांचे मार्गदर्शन लाभले तसेच श्रेणिक चौगुले यांनी सहकार्य केले

     बाजीराव खाडे,राजेंद्र यळगूडे,विनायक मगदूम,तुकाराम पाटील ,शिवाजी ठोंबरे,अजित माजलेकर,उदय गायकवाड,सचिन कोले,अरुण नवाले,राजाराम सुतार,राजेंद्र नाईक,सुखदेव शिंदे व प्रकाश रत्नाकर या शिक्षकांनी हे उदात्त कार्य केलं.

      शिक्षकांच्या या सेवाभावी कार्याने गुरुजन वर्गांचा सन्मान अधिक वाढला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा