करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षापासून बालवाडी, शाळा, महाविद्यालय व सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. मात्र ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम चालू आहे. या ऑनलाईन अभ्यासक्रमात विद्यार्थी व शिक्षक यांच्या समोर असेल तर शैक्षणिक प्रश्नांची गुंतागुंत निर्माण झाले आहे त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये पुस्तका भावी योग्य असा शैक्षणिक संवाद निर्माण होत नाही याचा अर्थ ऑनलाईन अध्यापनाचा फायदा होणार नाही.
अशा परिस्थितीत देखील नगरपरिषद शिक्षण विभागाचे शिक्षक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जयसिंगपूर नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांका ४ मध्ये आय.एस.ओ. सौ.शाहिस्ता आसिफ पटेल या पालकांच्या वाढदिवसा निमित्ताने इनरव्हिल क्लब ऑफ जयसिंगपूर हेरिटेजकडून 180 इयत्ता दुसरी ते इयत्ता सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रमचे 900 ब्रिज कोर्स अभ्याक्रम पुस्तिका देण्यात आले.
जयसिंगपूर हेरिटेजच्या सदस्या स्मिता पाटील, माधुरी शेडबाळे, कोमल पटरो, आशीन पटेल, नगरपरिषद शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख मेघन देसाई, मुख्याध्यापक महंमदआरिफ पटेल , सौ.अंजुम मुलाणी,आणि शिक्षक शिक्षिका व इतर मान्यवर उपस्थित होते.
उभा रचनात्मक उपक्रमाचे आभार सौ.तबस्सुम सोलापूरे यांनी मानले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा