हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती पद्मा चौक येथील साडी सेंटर समोरील पॅसेजमध्ये झोपण्याच्या कारणातून झालेल्या वादावादीत फिरस्त्याचा खून झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. अमर (वय 25 )असे खून झालेल्या फिरस्त्याचे नाव आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित सुरज चंद्रकांत कांबळे (वय 31) याला अटक केली. पद्मा चौक हा नेहमी गजबजलेला असतो.
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की,संशयित सुरज कांबळे व अमर हे दोघेही फिरस्ते आहेत.दहा वर्षापासून दोघेही एकमेकाला ओळखतात. मंगळवारी मध्यरात्री अमर हा पद्मा चौक येथील सत्यनारायण तालीम इमारतीत एका साडी सेंटर दुकानाच्या पॅसेजमध्ये जेवण करीत होता.त्याच्या शेजारी बसलेल्या संशयिताने ही माझी झोपण्याची जागा आहे. जेवण केल्यानंतर जागा स्वच्छ कर असे सुनावले. त्यावर अमर याने तुझ्या बापाच्या मालकीची जागा आहे का अशी विचारणा केली.या कारणातून दोघांत हमरीतुमरी, शिविगाळ आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. मद्यधुंद अवस्थेतील सुरज याने अमरच्या शर्टाची कॉलर पकडून डोके लोखंडी ग्रीलला जोरात आदळले.डोक्याला गंभीर इजा झाल्यानंतर त्यास उंचीवरून तळमजल्यावर ढकलून दिले. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले अमरचा काही वेळात जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, दोन फिरस्त्यामध्ये सुरु असलेल्या हाणामारीवेळी साद मोहम्मद शेख (रा. यादवनगर) याने मध्यस्थीचा प्रयत्न केला.मात्र, दोघांनी एकमेकांना शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
फिरत्याचा खून झाल्याचे निदर्शनास येताच शेख यांनी संशयित सुरज कांबळेला पकडून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हवाली केले.दोघांच्या झटापटीत सूरजने धक्का दिल्याने अमर हा सुमारे १० ते १२ फुट उंचीवरुन बेसमेंटमध्ये कोसळला.
डोक्याला गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.लक्ष्मीपुरी पोलिसांनी याप्रकरणी संशयित सूरज कांबळे याला ताब्यात घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा