शिरोळ तालुका प्रतिनिधी - रोहित जाधव
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत,अशावेळी देशभरात रात्रीचा दिवस करून ड्रायव्हिंग काम करणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत.अनेक राज्यातील लोक आपल्या वाहनाबरोबर अडकले आहेत.
उदगाव येथे सांगली - कोल्हापूर महामार्गावर ट्रक, टँकर, कंटेनर इत्यादींच्या चालक व किनर यांना काल महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे कोल्हापूर जिल्हा संघटक मा.संजय भंडारे यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.भगवंत जांभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जेवणाची सोय करून या आपत्तीच्या काळात त्यांना कसलीही गरज लागल्यास महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.यावेळी शिरोळ तालुकाध्यक्ष मा.कुमार पुदाले,तालुका सचिव मा.श्रीकांत सुतार,जयसिंगपूर शहराध्यक्ष मा. निलेश भिसे,विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष मा.सुशांत पाटील,शहर उपाध्यक्ष मा.अमित पाटील,माजी तालुकाध्यक्ष मा.कुबेर मगदूम महाराष्ट्र सैनिक रतन महाजन,गणेश भिसे,जावेद जमादार आदी महाराष्ट्र सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा