Breaking

गुरुवार, १५ जुलै, २०२१

नाईट कॉलेजमध्ये 'एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्स' संपन्न : संशोधक विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन देऊन मार्गदर्शकांनी प्रोत्साहित करावे: प्रा.डॉ.प्रविण सप्तर्षी

 



मालोजीराव माने :  कार्यकारी संपादक

इचलकरंजी :  येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड कॉमर्स, इचलकरंजीमध्ये 'जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय उच्चशिक्षण क्षेत्रापुढे असलेली आव्हाने' या विषयावर एकदिवसीय आंतर विद्याशाखा आंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्स अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली. सदर कॉन्फरन्समध्ये देशाच्या विविध महाविद्यालये, विद्यापीठांमधून १२५ पेक्षा अधिक अधिव्याख्यात्यांना ऑनलाईन सहभाग घेतला. या कॉन्फरन्ससाठी २५० संशोधकांनी संशोधन पेपर सादर केले होते. कॉन्फरन्समध्ये एकूण तीन सत्रांमध्ये तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यावेळी झालेल्या ऑनलाईन चर्चेमध्ये सहभागी अधिव्याख्यात्याने उत्साहात सहभाग घेतला. एकूण १५ संशोधकाने ऑनलाईन पेपर वाचण केले.

कॉन्फरन्सच्या सुरवातीला दे. भ. बा. भा. खंजिरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अरुणराव खंजिरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. पुरंदर नारे यांनी २०२० मध्ये जाहीर झालेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या या चर्चासत्रातील संशोधन पेपर, प्रश्नोत्तरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी बाबींचा लाभ भारतीय शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासन, विद्यार्थी, पालक, उद्योजक अशा सर्व घटकांना होणार असल्याचे स्पष्ट केले. कॉन्फरन्सच्या प्रारंभी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ मा. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांचे बीजभाषण झाले. त्यानंतर पार पडलेल्या तीन सत्रांमध्ये अनुक्रमे मा. डॉ. महावीर कोथळे (कर्नाटक), मा. श्री. सचिन तेरे (यूएई), मा. डॉ. अनुज कुमार (नागालँड) या तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. कॉन्फरन्सच्या संशोधन पेपर वाचन व समारोप सत्रा मध्ये मा. प्रा. भीमराव बनसोडे यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.

सरतेशेवटी कॉन्फरन्सचे संघटक सेक्रेटरी, महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख डॉ. माधव मुंडकर यांनी आभार प्रदर्शन केले. तत्पूर्वी कार्यशाळेच्या नेटक्या आयोजनाबद्दल सहभागी व्यक्तींनी महाविद्यालयाचे आभार मानले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. एम. आर. दांडेकर व प्रा. सौ. स्मिता मंतेरिओ यांनी पार पाडली. प्रारंभापासून ऑनलाईन कॉन्फरन्सच्या आयोजनासाठी कराव्या लागणाऱ्या तांत्रिक कार्याची जबाबदारी प्रा. सौरभ पाटणकर व प्रा संतोष माने आणि प्रा. व्ही. सी. मुत्नाळे यांनी तत्परतेने व सफाईदारपणे पार पाडली. कॉन्फरन्स यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे तसेच प्रशासकीय कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा