![]() |
शिवराज महाविद्यालय |
प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालय,गडहिंग्लज अर्थशास्त्र विभाग व IQAC विभागाच्यावतीने राज्यस्तरीय 'अर्थमंथन' ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ.प्रभाकर माने हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य ,.डॉ.कदम होते.
प्रारंभिक महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.डी.जी. गायकवाड यांनी उपस्थित मान्यवर व सहभागी असणाऱ्या सर्व घटकांचे स्वागत करून प्रास्ताविकात ते म्हणाले की, या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विविध विषयांना स्पर्श करणारे व वैचारिक मंथन घडवून विद्यार्थी, प्राध्यापक व इतर समाज घटकांना वैचारिक माहिती व ज्ञानाची शिदोरी प्रदान करावी हा उदात्त हेतू आहे.
ऑनलाइन व्याख्यानमालेच्या सुरवातीला कॉलेजचे प्राचार्य डॉ.कदम यांनी कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख मांडून त्यांनी शाहू राजांच्या शेती व जलसिंचन विषयक विचारांचा थोडक्यात आढावा घेऊन कार्यक्रमास प्रेरित केले.यानंतर प्रा. डॉ.डी.जी. गायकवाड यांनी प्रमुख वक्ते डॉ. प्रभाकर माने यांचा उत्साही परिचय करून दिला.
यानंतर 'राजर्षी छ.शाहू राजांचे शेती व जलसिंचनविषयक आर्थिक विचार' या विषयावर प्रथम वैचारिक पुष्पाची गुंफून करताना प्रमुख वक्ते प्रा.डॉ.प्रभाकर माने म्हणाले की, शाहू राजांनी कोल्हापूर संस्थानाचा चौफेर विकास करून अद्वितीय कामगिरी केली आहे.शेती- जमिनीचे विभाजन, कृषी शिक्षण, शेती व कर्जपुरवठा, कृषी प्रदर्शने, आधुनिक शेती व जोडव्यवसाय याबाबत सखोल मांडणी केली. शाहू राजांनी शेती व शेतकरी केंद्रबिंदू मानून शेती प्रगती करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर डॉ. प्रभाकर माने जलसिंचनाबाबत भाष्य करताना म्हणाले, शाहू राजांनी कोल्हापूर संस्थान शेती व औद्योगिक दृष्ट्या संपन्न करण्यासाठी शेती विकासाचा ध्यास डोळ्यासमोर ठेवून शेतीला आवश्यक असणाऱ्या पाणीपुरवठयाचे नियोजन केलं होतं. यामध्ये शिरोळ तालुक्यातील जल नियोजनाचं त्यांनी उदाहरण दिले. त्याचबरोबर संस्थानातील इतर मोठ्या घटकांनी जलसिंचन विकासासाठी सर्वतोपरी मदत करणे यासाठी महाराजांनी मोठं पाऊल उचललं.
संस्थानातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता पाणी व्यवस्थेवर कायमचा तोडगा काढण्यासाठी राधानगरी धरणाची कल्पना मांडून ती प्रत्यक्षात सत्यात उतरवली. याविषयी वास्तव व सखोल भाष्य केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ बी एम जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचा सूत्रबद्ध व उत्तम सूत्रसंचालन प्रा. पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ एस जी मुंज यांनी केले यांनी केले .
या आयोजनाबाबत विद्यार्थी व प्राध्यापक घटकाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
खुप सुंदर अर्थ व शेती विषयक मांडणी अभिनंदन सर
उत्तर द्याहटवा