Breaking

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

कोल्हापूरमधील प्रसिद्ध रंकाळा तलाव दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो

 


 

हेमंत कांबळे :  कोल्हापूर शहर प्रतिनिधी


कोल्हापूर : मध्ये  सतत दोन दिवस मुसळधार पावसामुळे यंदा कोल्हापूरमधील प्रसिद्ध रंकाळा तलाव  दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो झाला . साधारण सायंकाळी ७ वाजता रंकळा तलाव सांडव्यातून प्रवाहीत झाला . ह्या अगोदर २००५ साली पहिल्यांदा ओव्हर फ्लो झाला होता . सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे नागरीवस्तीमध्ये पाणी शिरले आहे त्यामुळे नागरीक  सुरक्षित ठिकाणी जात आहेत. रंकाळा स्टँड परीसरात तसेच संध्यामठ गल्ली जाऊळाचा गणपती ह्या परीसतील घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नाही . . परीसरातील नागरीकांना सावधानतेचा इशार प्रसाशनाकडून देण्यात आला आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा