सातारा : पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी नावाच्या गावात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पूर्ण गाव खचल्याची माहिती प्रथम दर्शनी मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाला तातडीने इतरत्र हलविण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहे. गावातील बहुतांशी गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी गेली असल्याची माहिती तहसीलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे.
किल्ले मोरगिरी येथे भूस्खलन झाल्याने गावातील सर्व यंत्रणा बंद पडलेल्या होत्या त्यामुळे प्रशासनाला माहिती मिळाली नव्हती.लोक नातेवाईक व इतरत्र गेल्यानंतर सदर घटनेची माहिती मिळाली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा मोठी वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मात्र प्रशासनानेही या भागात मोठ्या प्रमाणावर पाहणी करू शकले नाही. गावातील सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले या घटनेची माहिती प्रशासनाला मिळण्याआधी बहुतांश ग्रामस्थ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईक, मित्र व इतरत्र आश्रा शोधात गाव सोडून निघून गेले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा