हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
शिरोली पुलाची (कोल्हापूर) : सांगली फाटा येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय (Pune-Bangalore National Highway) महामार्गावर आलेल्या महापुराच्या पाण्याची जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे (Shailesh Balkwade) यांनी पाहणी केली. आज दुपारी पोकलँडने रस्त्याची चाचपणी केली ; मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे पोकलँड आत जाऊ शकला नाही. त्यामुळे सांयकाळी पुन्हा पोकलँडने रस्त्याची चाचपणी करुन, त्यानंतर अवजड वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे बलकवडे यांनी सांगीतले.यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ ,पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी किरण भोसले व टीम या पाहणीत सहभागी होते."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा