चिदानंद अळोळी : औरवाड प्रतिनिधी
औरवाड : राजीव नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री प्रतापराव आगरे याच्या मार्फत औरवाड येथे महापुरात अविरत अन्नदान सेवा सुरू आहे.दररोज 300 ते 400 पूरग्रस्त लोकांना सकाळी व संध्याकाळी शुद्ध व सात्विक जेवण पुरविण्यात येत आहे . या संकटंमय काळात लोक जातपात व धर्म बाजूला ठेवून माणुसकी धर्म जोपासत आहेत . सर्व लोक एकत्र येऊन संकटाला सामोरे जात आहेत. पूरग्रस्त नागरिक एकत्र येऊन संकटाला सामोरे जात आहे यातून देशाची एकात्मता दिसते . या अन्नदान सेवेत गावातील तरुणाई निस्वार्थी भावनेने व सेवावृत्तीने मदत करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा