प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक
शिवाजी विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या संकेतस्थळात नामबदल करण्यात आला आहे. सध्या असलेल्या http://online.unishivaji.ac.in या संकेतस्थळावरील विविध ऑनलाइन वेब अँप्लिकेशनचा वापर, विद्यापीठाच्या विविध विभागातील, अधिविभागातील, तसेच संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी/कर्मचारी व विद्यार्थी वर्ग करीत होते.
मात्र काही तांत्रिक कारणामुळे 27/07/2021 रोजीपासून सदर संकेतस्थळाच्या नावात बदल करून http://webapps.unishivaji.ac.in असे करण्यात आलेले आहे.
त्यामुळे दि. 27/07/2021 रोजी पासून या अनुषंगाने सर्व विभाग,अधिविभाग व सर्व महाविद्यालये यांना कळविण्यात आले असून यापुढे /http://online.unishivaji.ac.inच्या ऐवजी👇
http://webapps.unishivaji.ac.in चा वापर करण्यात यावा.
तसेच यापूर्वी कार्यालयीन परिपत्रकात http://online.unishivaji.ac.in उल्लेख/संदर्भ असल्यास तो👇
http://webapps.unishivaji.ac.in असा वाचण्यात यावा.
अशा प्रकारची माहिती डॉ.विलास द. नांदवडेकर, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी जा.क्र./शि.वि/ इंटरनेट/२०-२१/१दि. २७/७/२०२१ च्या परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
त्यामुळे आता विद्यापीठाचे संकेतस्थळ बदलले आहे याची सर्व घटकांनी नोंद घ्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा