अतिग्रे (ता.हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केद्रात आरोग्य सेवकाने आत्महत्या केली. रमेश धोंडीराम कोरवी (वय ५०, रा. हरिओम नगर, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. ही घटना समजताच गावात खळबळ उडाली आहे.
सरपंचांसह गावातील प्रमुख मंडळीनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले आले. आरोग्य केंद्रात दोन्ही दरवाजे बंद असल्याने दरवाजे तोडून हातकणंगले पोलिसांनी आत प्रवेश केला. मृतदेह विच्छेदनासाठी हातकणंगले आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा