Breaking

रविवार, ४ जुलै, २०२१

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिडेटमध्ये १० वी पास असणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी

 



   १० वी पास असणाऱ्या तरुणांना आता भारत सरकारच्या कंपनीत (Government of India) काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिडेट (Nuclear Power Corporation of India Limited) या भारत सरकारच्या कंपनीमध्ये असंख्य पदे रिक्त असून लवकरच पदभरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यापूर्वी अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे.

     न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिडेटमध्ये ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice) या पदासाठी १२१ जागा रिक्त आहे. या पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला (वेबसाईट) भेट द्यावी लागणार आहे.

      या संकेतस्थळावर उमेदवारांना ऑनलाइन स्वरुपात फॉर्म भरावा लागले.


शैक्षणिक पात्रता -


ट्रेड अप्रेन्टिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून दहावीची परिक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसंच त्यांच्याकडे आयटीआय पदवी असणं आवश्यक आहे.


निवड प्रक्रिया -


दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तसंच ट्रेड अप्रेन्टिस या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२१ आहे. इच्छुक उमेदवार येथे क्लिक करुन ऑनलाइन फॉर्म भरू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा