Breaking

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

प्राध्यापक भरतीसाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे राज्यव्यापी स्मरण आंदोलन : मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर




 प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


 दि. २७ जुलै २०२१ ते ०८ ऑगस्ट २०२१ दरम्यान शासनास जागे करण्यासाठी आणि प्राध्यापक भरती बाबत घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीतील गतिशीलता वाढविण्यासाठी नेट-सेट,पीएच.डी धारक संघर्ष समिती "राज्यव्यापी स्मरण आंदोलन" करणार आहे असे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदनातून कळवले आहे. याच बरोबर दि. ९ ऑगस्ट २०२१ (क्रांती दिन) रोजी महाराष्ट्रातील तमाम नेट-सेट, पीएच.डी पात्रताधारकांना "सामूहिक आत्मबलिदान" करण्यास शासनाकडून परवानगी पण समितीने निवेदनातून मागितली आहे.

        संघटनेकडून विविध मागण्यांसाठी २१ ते २७ जून २०२१ दरम्यान करण्यात आलेले बेमुदत सत्याग्रह आंदोलनाची दखल घेत शासनाकडून मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदयजी सामंत साहेब, मा. संचालक उच्च शिक्षण डॉ.धनराज माने साहेब, मा.पुणे जिल्हाधिकारी श्री.राजेश देशमुख साहेब, मा.सचिव उच्च शिक्षण विभाग श्री.ओ.पी.गुप्ता (व्ही.सी.),  मा.सह-सचिव उच्च शिक्षण विभाग श्री.द. रा. कहार आदि प्रशासकीय पदाधिकाऱ्यांसोबत दि.२७ जून २०२१ रोजी वरील मागण्यांच्या परिपूर्तीसाठी आंदोलन स्थळावर येत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शासनातर्फे मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदयजी सामंत आश्वासन देत म्हणाले की "२०१७ च्या आकृतिबंधानुसार रिक्त पदांच्या ४०% पदे (एकूण ३०६४ पदे) भरण्याचा शासन निर्णय त्वरित (८ दिवस) काढणार, २०२० च्या आकृतिबंधनुसार रिक्त  पदांच्या मान्यतेचा प्रस्ताव वित्त विभागाला मान्यतेसाठी २ महिन्यात सादर करण्यात येईल. या पदाच्या ४०% जागादेखील दोन-तीन महिन्यात भरल्या जातील. परंतु आश्वासन देऊन एक महिना उलटून ही भरती चा जी.आर. निघाला नाही. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून संघटना दि. २७ जुलै २०२१ ते ०८ ऑगस्ट २०२१ दरम्यान शासनास जागे करण्यासाठी "राज्यव्यापी स्मरण आंदोलन"  करणार आहे. तसेच दरम्यानच्या काळात निश्चित केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीमध्ये  योग्य ती गती प्राप्त न झाल्यास दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील तमाम नेट-सेट, पीएच.डी पात्रताधारकांच्या पूर्व परवानगीने आपणास मंत्रालय, मुंबई तसेच संचालक उच्च शिक्षण, पुणे या ठिकाणाहून "सामूहिक आत्मबलिदान" करण्यास शासनाची परवानगी मिळणेकामी विनंती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा