Breaking

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

महापुराच्या भीतीने अकिवाट व परिसरातील नदीकाठच्या जनावरांचे इतरत्र स्थलांतर

 


प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी


    अकिवाट व परिसरातील नदीकाठची जनावरे बाहेर आणण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोयना धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून कृष्णानदी पात्राबाहेर वाह आहे त्यामुळे शासनाकडून वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देखील नदीकाठच्या गावांना देण्यात येत असून अकिवाट व परिसरातील नदीकाठची जनावरे माळ भागावर व गावात हलवण्याचे काम काल पासून दिवसभर युद्धपातळीवर सुरू आह


      2005 व 2019 यावर्षीच्या महापुरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली त्यामुळे लाखोंचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते. त्याची धास्ती आजदेखील पूर बाधित क्षेत्रात दिसून येते त्यामुळे चालूवर्षी कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घेण्याचा निश्चय नदीकाठच्या नागरिकांनी केलेला दिसून येत आहे काल दिवसभर देखील पावसाची रिपरिप सुरू होती. तरीदेखील शेतकऱ्यांनी आपली जनावरे वाचवण्यासाठी मोठ्याप्रमाणावर धडपड करत असताना दिसून आले आहे. काही शेतकरी आपली जनावरे गावातच आपल्या घराजवळ आडोसा करून बांधताना दिसून येत आहेत तर काही लोक माळ भागात आपली जनावरे घेऊन तेथेच आसरा करून आपली जनावरे बांधून चाऱ्याची सोय करताना दिसत आहेत. चालू वर्षी सुरू असलेला पाऊस पाहता 2019 ची पुनरावृत्ती होते की काय ?अशी भीती नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतावत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा