कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे जेष्ठ साहित्यीक डॉ. राजन गवस यांच्या मुलगा व मुलीच्या नावे बनावट वॉट्सअप अकाउंट उघडून अनेक मुलींना त्रास देणार्या भामट्यावर पोलीसांनी महिना लोटला तरी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.जेष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी तक्रार अर्ज दाखल करून तब्बल एक महिना लोटला आहे. तरी तपासाच्या नावाखाली भुदरगड पोलीसांची टाळाटाळ सुरु असुन अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. ठग मोकाटच आहे. त्यामुळे भुदरगड पोलीसांच्या कामकाजा बद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
भुदरगड तालुक्यातील एका युवकाने डॉ. राजन गवस यांच्या मुलगा व मुलीच्या मोबाइल क्रमांकावरून (9322617599) बनावट वॉट्सप अकौंट तयार केले आहे.
या अकौंटवर त्यांनी डॉ. गवस यांच्या कुटुंबियांचा फोटो लावला आहे.
या अकाउंटवरून तो गेल्या दिड तो दोन वर्षांपासून अनेक मुलींशी, मुलाशीं चॅटींग करीत आहे.
आपण डॉ. गवस यांच्या घरी राहत असून पुस्तके लिहित असल्याचा कांगावा करत होता.तसेच पुण्यामध्ये डॉ. गवस यांच्या मुलीच ऑफीस असून या ठिकानी पुस्तक प्रकाशीत केली जातात.या ऑफीसमध्ये जॉब असल्याचे तो मुलींना सांगून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होता.
दोन मुलींना त्यांने बँकेचे धनादेश देखील दिले आहेत. मुलीशी चॅटींग करताना डॉ. गवस यांची मुलगी चॅटींग करते असे तो भासवत होता.
मोबाइलवर तो स्वत: बोलत नव्हता. फक्त चॅटींग करत होता. त्यामुळे मुलींना ही गोष्ट लक्षात येत नव्हती.
गेल्या महिन्यात एका युवतीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने डॉ. गवस यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली.त्यानंतर डॉ. गवस यांनी २४ जुन रोजी भुदरगड पोलीसात तक्रार दाखल केली आहे. महिना होत आला तरी पोलीसाकडून तपास सुरु असल्याचे सांगीतले जात आहे.
अद्याप त्या तरुणावर गुन्हा दाखला झालेला नाही किंवा सखोल तपास झालेला नाही.या तरूणाने मुंबई, पुणे या ठिकाणी नोकरी लावतो, अशी खोटी बतावणी करून अनेक मुलींना फसविल्याची चर्चा आहे.
एका जेष्ठ साहित्यिकाच्या तक्रारी बाबत इतकी दिरंगाई लागत असेल तर सामान्यांचे काय असा प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे.
दरम्यान, याबाबत प्रतिक्रियेसंदर्भात सहाय्यक पोलीस निरिक्षक सतीश मयेकर यांच्याशी संपर्क साधला असता सुट्टीवर असुन उद्या या बाबत बोलू असे सांगीतले.
भामट्याचा फोन स्विच ऑफ…..
डॉ. गवस यांनी पोलीसात तक्रार दाखल केल्याची कुणकुण या भामट्यास लागताच गेल्या काही दिवसापासुन या भामट्याचा फोन स्विच ऑफ झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा