Breaking

रविवार, ११ जुलै, २०२१

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी इंधन दरवाढी विरोधात ही केले निदर्शने

 

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरूवारी इंधन दरवाढी विरोधात निदर्शने केली. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर तातडीने निम्म्याने कमी करण्याची मागणी शेतकरी आंदोलकांनी केली.

      कृषी कायद्यांविरोधात शेतकरी सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने इंधन दरवाढीविरोधात देशव्यापी निदर्शने करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी देशात विविध ठिकाणी निदर्शने केली.निदर्शनांचा भाग म्हणून शेतकरी महामार्गांलगत त्यांच्या वाहनांसह जमा झाले. निदर्शनांसाठी दोन तासांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता.

   निदर्शनांमुळे वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.निदर्शनांवेळी इंधन दरवाढ मागे घेण्याच्या मागणीकडे मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाच मिनिटांसाठी वाहनांचे हॉर्न वाजवण्यात आले. सरकारला जागे करण्यासाठी ती कृती करण्यात आल्याचे आंदोलकांनी म्हटले.

    निदर्शनांवेळी सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणाही देण्यात आल्या. इंधन दरवाढीविरोधातील निदर्शनांना पंजाब आणि हरियाणा या राज्यांत लक्षणीय प्रतिसाद मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा