रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी
जत सारख्या सतत दुष्काळी भागात डाळिंब, द्राक्ष आणि बोर या मुख्य पिकाबरोबर ड्रॅगन फ्रुट आणि अवोकॅडोची शेती होऊ लागली आहे.
व्यवसायाने क्रीडा शिक्षक असणारे अझहर शेख यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत 5 एकर माळरान शेत जमिनीत विविध प्रयोग करत 2016 साली ड्रॅगन फ्रुट या पिकाची 1 एकर क्षेत्रा मध्ये 520 पोलची लागवड केली. 1 एकरी 2200 रोपांची लागवड केली यासाठी शेख यांना चार लाखांचा खर्च आला. चौथ्या वर्षी( 2021) 10 टन पेक्षा अधिक उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे.
एवढ्यावरच न थांबता इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित ट्रेलिस मेथड ने 1 एकर लागवडीला सुरवात केली.लागवड करत असताना भारत ,आफ्रिका आणि बांगलादेशातील शेतकरी मित्रांची मदत घेतली.या लागवडीसाठी 8 टन लोखंडी अँगल वापरले.सव्वा ते दीड फुटावर रोपांची लागण केली एकरी 6000 रोपे लागली .या लागवडी साठी एकूण 8 लाख पर्यंत खर्च आला. 10 व्या महिन्यातच या बागेतील झाडांनी फळे द्यायला सुरुवात केली .
प्रयोग करणार नाही तो शेतकरी कसला..शेती मध्ये प्रयोग करायचे याचे जणू त्यांना वेडच लागले होते आणि जानेवारी 2021 मध्ये मेक्सिकन हॅस एवोकॅडो जातीची 60 रोपांची लागवड केली साठ रोपांसाठी 1लाख रुपये त्यांना खर्च आला.
या व्यतिरिक्त शेख यांच्या शेता मध्ये सफरचंद ,वॉटर अप्पल, सीताफळ, पेरू व आंबा अशा विविध फळझाडांची लागवड केली आहे.
ड्रॅगन फ्रुट आणि अवोकॅडो या फळ पिकातून त्यांना चांगला नफा त्यांना मिळत असून जिद्द आणि प्रयत्नच्या जोरावर शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगात मिळवलेले यश आजच्या तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा