Breaking

बुधवार, २१ जुलै, २०२१

*कोरोना काळातील विठ्ठल भक्ती लेझीम व योगाच्या माध्यमातून*

 



शिरोळ तालुका प्रमुख  प्रतिनिधि - रोहित जाधव


मिरज : कोरोना महामारी ची बिकट स्थिती असताना तसेच शासन नियमांचे काटेकोर पालन करत असल्यामुळे कोरोना महामारीच्या काळात पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. यासाठी मिरजेतील महिलांनी लेझीम,योगा व नृत्य या माध्यमातून विठ्ठल भक्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. मिरजेतील कल्पतरू कॉलनीतील ओम साई योगा क्लासेसच्या संचालिका मीनाक्षी फडके यांनी एकादशीच्या पूर्वसंध्येला असे नृत्य सादर करण्यात पुढाकार घेतला .

      या नृत्यामध्ये गौरी भोईटे, दीपाली जाधव ,डॉ.अश्विनी कोळेकर, डॉ.अपर्णा पुजारी, मेघा शिंदे, स्नेहा मूलचंदानी, अंजली पाटील, आरती आचार्य ,संगीता डोंगरे, यांचा सहभाग होता. यावेळी मंदार भोईटे यांनी पांडुरंगाची व डॉ. मयुरी फडके यानी रुक्मिणीची भूमिका सादर केली.

      कोरोना महामारीच्या काळात महिलांच्या मध्ये आरोग्य टिकून राहावे यासाठी नियमित योगासने व नृत्य  याचा खूप उपयोग होत असून  योगासनांमुळे ऑक्सिजनची पातळी टिकण्यास मदत होते.नृत्यामुळे निराश झालेले मन प्रफुल्लीत होत असे मत सौ.मीनाक्षी फडके यांनी यावेळी व्यक्त केले. न्यू इंग्लिश स्कूलचे अग्रवाल सर तसेच रेवती फडके यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

      या अनोख्या उपक्रमामुळे सर्वत्र समाधानकारक व आनंदी चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा