गणेश कुरले : धरणगुत्ती प्रतिनिधी
तेरवाड : महापुराचा फटका संपुर्ण कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील लोकांना बसला आहे ,आपल्या कुरूंदवाड नगरीला बेटाचे स्वरुप आले आहे. तलाठी मा.सुरज माने साहेब व ग्रामसेवक मा.उमेश रेलेकर यांच्या माहिती नुसार जवळपास तिनशे लोक तेरवाड व गंगापूर येथे मराठी शाळा, आश्रमशाळा, संजीवनी हायस्कूल, सिद्धार्थ हायस्कूल, येथे वास्तव गेले तीन चार दिवस करत आहेत पण कोणत्याही प्रकारची मदत त्यांना मिळाली नाही ही बाब अत्यंत निराशाजनक होती त्यामुळे आम्ही कै. गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशन तेरवाड यांच्या वतीने व गंगापूर मातंग समाज यांच्या सहकार्याने आज या सर्व लोकांना एक वेळचे जेवण व पिण्यासाठी बिसलरी बाटल्या वाटप केल्या आहेत.
या प्रसंगी तेरवाड गावच्या सदस्या श्रीमती शोभा गोविंद आवळे, उमेश गोविंद आवळे फौंडेशनचे अध्यक्ष तसेच भाजप शहर अध्यक्ष आमगौडा पाटील, मा. अमोल खोत सर व गुरुकृपा पेट्रोल पंपाचे मालक गायकवाड साहेब, मुरग्याप्पा हेगडे दादा, मेजर किरण बिरणगे, तुकाराम आवळे, रवि आवळे, उमेश शेडबाले, रवी हेगडे, सुरेश शेडबाले, शिवा मांग,असिफ अत्तार ,सामाजिक कार्यकर्ते मा. रमेश मालगे साहेब व शिवाजी खोत साहेब पण या प्रसंगी वाटप करण्यासाठी होते.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा