Breaking

मंगळवार, २७ जुलै, २०२१

शिरोळ पंचायत समिती उपसभापती राजगोंडा पाटील यांनी कोथळी पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी केली चाऱ्याची सोय

 


जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी


     शिरोळ तालुक्यामध्ये महापुराने हाहाकार माजविल्याने सर्वत्र भीती व अस्वस्थता निर्माण झाली होती. यामध्ये मनुष्य हानी होऊ नये यासाठी सर्वतोपरी खटाटोप प्रशासनाकडून व ग्रामपंचायती कडून करण्यात आला होता मात्र महापुरात दुभती जनावरांचे संगोपन करणे अत्यंत कठीण होते अशावेळी शिरोळ पंचायत समितीचे उपसभापती राजगोंडा पाटील यांनी पूरग्रस्तांच्या जनावरांचे हाल पाहून मूक जनावरांच्या चाऱ्याची सोय केली. सुमारे ५ टन इतक्या ऊस चाऱ्याची सोय करत आज दि:-२६ जुलै २०२१ रोजी सुमारे १५२ जनावरांना चारा देण्याची व्यवस्था केली. यामध्ये त्यांनी  प्रत्येक जनावरास एक मुळी ऊस अशा स्वरुपात चाऱ्या देण्यात आला आहे. तसेच  उर्वरित चाऱ्याचे वितरण उद्या केले जाणार आहे. 

   राजगोंडा पाटील यांनी केलेल्या मूक जनावरांच्या चाऱ्याची सोय करून दिल्यामुळे पूरग्रस्तांना कडून मनस्वी आभार व समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा