बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर पॉर्नोग्राफी म्हणजेच अश्लील चित्रपट बनवल्याचा आणि काही ऍप्सवर ते अपलोड केल्याचा आरोप आहे. राज कुंद्राबाबत आलेल्या या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले आहेत.
मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितले की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई क्राईम ब्रांचमध्ये पॉर्नोग्राफी चित्रपट बनवला जाण्याचा आरोप दाखल करण्यात आला होता. तक्रारीत असा आरोप लावण्यात आला होता की, हे चित्रपट बनवून काही ऍप्समार्फत अपलोड केले जातात. या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आपला तपास सुरू केला.
आयुक्तांनी म्हटले की, तपासादरम्यान स्पष्ट झाले की, या रॅकेटमध्ये राज कुंद्रा मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांना त्याच्याविरुद्ध अनेक ठोस पुरावे सापडले आहेत. त्यानंतर सोमवारी (१९ जुलै) त्याला अटक करण्यात आली. त्यांनी असेही म्हटले की, या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, सर्वप्रथम सॉफ्ट पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचा महाराष्ट्र सायबर सेलने जबाब घेतला होते. सेलने यावर्षी २६ मार्च रोजी याप्रकरणात एकता कपूरचाही जबाब नोंदवला होता.
याव्यतिरिक्त शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी महाराष्ट्र सायबर सेलला जबाब दिला आहे की, त्यांना ऍडल्ट इंडस्ट्रीत आणणार राज कुंद्रा आहे. त्याने शर्लिनला प्रत्येक प्रोजेक्टसाठी ३० लाख रुपये दिले आहेत. शर्लिनने राज कुंद्रासोबत जवळपास १५ ते २० प्रोजेक्ट्स केले आहेत.
राज कुंद्रा नुकतेच आपल्या पूर्वाश्रमीची पत्नी कविताबाबत केलेल्या खुलाश्यांमुळेही तो चर्चेत राहिला आहे. राजने असे म्हटले होते की, त्याची पूर्वाश्रमीची पत्नी कविताचे त्याच्या मेहुण्यासोबत अफेअर होते.
याव्यतिरिक्त त्याच्या आणि शिल्पा शेट्टीबाबत बोलायचं झालं, तर त्यांनी २२ नोव्हेंबर, २००९ रोजी लगीनगाठ बांधली होती. त्यांना वियान आणि समिशा ही दोन अपत्य आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा