Breaking

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

अलमट्टी धरणातून पाण्याच्या विसर्गामध्ये प्रचंड वाढ



 मालोजीराव माने : कार्यकारी संपादक


अलमट्टी धरणातून कालपासून ८७ हजार क्युसेकने केलेला पाणी विसर्ग आज सकाळ पासून एक लाख सतरा हजार (१,१७,०००) ने वाढविण्यात आला होता. तर दुपारपासून एक लाख सत्तावन (१,५७,०००) हजार ने वाढवण्यात आलेला विसर्ग आता एकूण आता 2 लाख क्युसेकने केला असल्याची बातमी येत आहे. त्यामुळे सांगली व कोल्हापूर मधील पुराची पातळी कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु कोल्हापूर व सांगली परिक्षेत्रातील पाऊस असाच मुसळधार पडत राहिला तर परिस्थिती अजुन भयंकर होण्याची शक्यता आहे. आणि अजुन दोन ते तीन दिवस असाच पाऊस पडला तर पूरपरिस्थिती २०१९ पेक्षाही भयंकर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा