करण व्हावळ : जयसिंगपूर प्रतिनिधी
जयसिंगपूर : फादर स्टेन स्वामी या मानवतावादी विचारवंतास शहरी नक्षलवादी ठरवून देश द्रोहाच्या खोट्या गुन्ह्याखाली त्यांना अटक केली होती. फादर स्टेन स्वामी यांचा नुकताच तुरुंगात मृत्यू झाला असून ते धर्मांध शक्तीच्या आणि केंद्र सरकारच्या अत्याचाराचे बळी ठरले. त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या लोकशाही व संविधान विरोधी धर्मांध शक्ती व केंद्र सरकारचा जयसिंगपूर येथे मुसळधार पावसात निदर्शने करून निषेध करण्यात आला.
वयाच्या 84 व्या वर्षी फादर स्टेन स्वामी यांना केंद्र सरकारने खोट्या आरोपाखाली अटक करून गेल्या वर्षभरापासून तुरुंगात डांबले होते. त्यांच्यावर उपचार न करता त्यांच्या आरोग्याची हेळसांड केली. त्यामुळे त्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. भारतीय लोकशाही आणि स्वातंत्र्याला काळीमा फासणारी ही घटना निंदनीय आहे. अमानवी व्यवस्थेच्या सरकारकडून त्यांचा बळी घेतला. या घटनेचा शिरोळ तालुका पुरोगामी मंच, जन आंदोलनांची संघर्ष समिती, समाजवादी प्रबोधिनी आणि शिरोळ तालुका ओबीसी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने जयसिंगपूर येथील क्रांती चौकात निदर्शने करून निषेध करण्यात आला. तसेच यु. ए. पी. ए. हा अन्यायी जुलमी कायदाही रद्द करावा अशी मागणीही यावेळी कार्यकर्त्यांनी केली. फादर स्टेन स्वामी अमर रहे च्या घोषणांनी जयसिंगपूरचा क्रांती चौक दणाणून सोडला. डॉ. चिदानंद आवळेकर, कॉम्रेड रघुनाथ देशिंगे,
शांताराम कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना संविधानाचे महत्व सांगून केंद्र सरकारचा कडक समाचार घेतला. पुरोगामी मंचचे बाबासाहेब नदाफ, खंडेराव हेरवाडे, सचेतन बनसोडे, ओबीसी फाऊंडेशनचे बाबासाहेब बागडी, संजय गुरव, संजय सुतार, इब्राहिम मोमीन, राकेश कांबळे, राकेश धनपाल कांबळे, पांडुरंग भंडारे, मुस्लिम सेनेचे अध्यक्ष समीर पटेल, प्रा.डॉ प्रभाकर माने, इक्बाल इनामदार, रतन शिकलगार, राजू मांजर्डेकर व संदीप शेडबाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा