Breaking

बुधवार, २१ जुलै, २०२१

*वाठार येथील एका बेवारस निराधार व्यक्तिला दिला माणुसकी फौंडेशनने आधार*

 


रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी


इचलकरंजी : माणुसकी फाउंडेशन माणुसकीचे दर्शन घडवित अनेक उपक्रम राबवित असते.वाठार येथील एका बेवारस निराधार व्यक्तिला माणुसकी फौंडेशनने आधार दिला.अंबप गावचे रहिवासी किशोर जासूद यांचा माणुसकी फौंडेशनला कॉल आला,एक निराधार व्यक्ती वाठार येतील ब्रिज खाली गेले खूप दिवस हलाखीत राहत आहे,माणुसकी फौंडेशनला याची माहीती मिळताच सर्वांनी पोहचून त्यांना इचलकरंजी येते आणले. त्या व्यक्तीला अंघोळ घालून त्याला स्वच्छ करून त्यांचावर योग्य औषध उपचार करून त्याला चांगले कपडे घालण्यास दिले,या व्यक्तीला निराधार केंद्रात ठेवण्यात आले.

     यासाठी माणूसकी फौंडेशन अध्यक्ष मा.रवी जावळे दादा,ऋषिकेश चव्हाण,गोपाळ उरणे,आनंद इंगवले,दिपक पाटील,रंकीत रॉय,चेतन चव्हाण,यशवंत चव्हाण, शकील मुल्ला,रघुनाथ हाळवणकर, रवी धनगर, ऋषिकेश सातपुते,रसिका फोटो या सर्वांचे सहकार्य लाभले, माणुसकी फौंडेशन महाराष्ट्र, राज्य समाजसेवेस सदैव तत्पर राहील असे फौंडेशनच्या वतीने सर्वांना सांगण्यात आले.

     माणुसकी फाउंडेशनच्या या समाजोपयोगी कृत्यामुळे सर्वत्र समाधान व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा