गणेश कुरले : शिरोळ प्रतिनिधी
डॉक्टर्स डे व कृषी दिन साजरा :
शिरोळ : रोटरी क्लब व नगरपालिका यांच्या माध्यमातून घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. गेली बारा वर्षे रोटरी क्लबने सामान्यांना केंद्रबिंदु मानून केलेले काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले.
येथील रोटरी क्लबच्यावतीने कोविड साथीच्या कालावधीमध्ये देवदूत ठरलेले वेगवेगळ्या विभागातील डॉक्टरांचा सन्मान त्या बरोबरच सी.ए.डे व कृषीदिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. एस. पी. माने, डॉ. ई. व्ही. देशपांडे, डॉ. आनंदा काळे, डॉ. अनिरुध्द काळे, डॉ. विशाल चौगुले, डॉ. सरला माने, डॉ. पल्लवी हुग्गे, चार्टर्ड अकौंटंट सुरज निळकंठ, शेतकरी महेश पाटील, राजेंद्र पाटील, सुनिल मुळे यांच्यासह डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.प्रारंभी स्वागत चिंतामणी गोंदकर तर प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष दिपक ढवळे यांनी केले.
याप्रसंगी असिस्टंट गर्व्हनर रुस्तम मुजावर, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, दगडू माने यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते. सचिव सचिन देशमुख यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा