मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
अन्यथा : अन्नत्याग करण्याचा आई वृध्दाश्रमाचा ईशारा..
लोकप्रिय उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडून पाच कोटींची खंडणीची मागणी व खंडणी न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या देणा-या मुख्य सुत्रधाराला अटक करावी. तसेच संजय घोडावत आणि कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे अशा प्रकारची मागणी आई वृध्दाश्रमातील अनाथ व निराधार वृध्दांनी केली आहे . सदर निवेदन जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक मा.रमेश वैंजन यांना देण्यात आले आहे.
लाॅकडाऊनच्या काळात आई वृद्धाश्रम मोठ्या अडचणीत सापडले असता घोडावत फौंडेशन आई वृध्दाश्रमाच्या मदतीला निस्वार्थी भावनेने धावून आले आणि त्यांनी दोन महिने आई वृध्दाश्रमाला जेवण देऊन परोपकाराचे कार्य केले अन्यथा आई वृध्दाश्रमातील अनाथ व निराधार वृध्द महिला या अन्नावाचुन मेले असते.
लाॅकडाऊनच्या काळात अन्नदाता म्हणुन घोडावत फौंडेशनने हजारो गरजू लोकांना अन्नदान केले असून हे त्यांचे उपकार आजन्म फेडणे शक्य नसल्याचे म्हटंले आहे.
पण अशा सामाजिक संवेदनशीलता व बांधिलकी जपणाऱ्या घोडावत यांना खंडणीसाठी जीवे मारण्याच्या दमक्या येत असतील तर हे निंदणीय कृत्य आहे अशा कृत्याचा आई वृध्दाश्रमाने निषेध सुध्दा व्यक्त केला आहे.
सदरची निवेदन आणि आंदोलन उपकाराच्या परतफेडीसाठीचे नसून त्या उपकाराची जाणीव ठेऊन थोडीफार कृतज्ञता व्यक्त करता यावी. तसेच 'लाख मेली तर चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' या भावनेतून उद्योगपती संजय घोडावत यांना धमकाविणा-या मुख्य सुत्रधाराला अटक करावी आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी आई वृध्दाश्रमाकडुन करण्यात आली आहे.
सदरची मागणी दोन दिवसांत मान्य न झालेस आई वृध्दाश्रमाकडुन दि. ४/७/२०२१ रोजी पासून वृध्दांसह अन्नत्याग करण्याचे जाहीर केले आहे.
सदर निवेदनावर आई वृध्दाश्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले व सचिव रेश्मा भोसले यांच्या सह्या असून सदरचे निवेदन जिल्हा पोलिस प्रमुख व जयसिंगपूर पोलीस ठाण्यास दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा