Breaking

रविवार, २५ जुलै, २०२१

कोथळी येथील पूरग्रस्तांसाठी शरद अग्रिकल्चर कॉलेज जैनापूर ठरले उत्तम आश्रयस्थान

 

  शरद अग्रिकल्चर कॉलेज,जैनापूर   



जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी

  कोथळी येथील महापुरामध्ये अडकलेल्या सुमारे ४००पूरग्रस्तांची नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शरद अग्रीकल्चर कॉलेज येथे लोकांची राहण्याची तसेच सकाळी दोन वेळेच्या चहा,नाष्टा व  जेवणाची अशी पूरग्रस्तांची परिपूर्ण सोय यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने यड्रावकर गटाचे गटनेते संजय नांदणे यांनी करून दिली आहे.     


      या फाउंडेशने पूरग्रस्तांना दिलेल्या परिपूर्ण सोयीबद्दल पुरग्रस्ताकडून आभार व्यक्त केले जात आहे. तालुक्यात शिरोळ तालुक्यातील बऱ्याचशा पूरग्रस्त भागात नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे व पूरग्रस्तांच्या  प्रश्नांचे निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

    यड्रावकर सोशल फाऊंडेशनच्या या समाजभिमुक कार्याबद्दल पूरग्रस्तांच्या कडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा