![]() |
राधानगरी धरण |
कोल्हापूर: राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने त्याचे दोन स्वयंचलीत दरवाजे खुले झाले आहेत. यातून प्रत्येकी १४२८ प्रमाणे २८५६ क्यूसेक व विज निर्मितीसाठी १४०० असा एकूण ४२५६ क्यूसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे.
धरणाचे दरवाजे उघडल्याने त्याचा फटका कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला बसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने केला आहे.
पावसाचा जोर कमी असला तरी अधुनमधून त्याची हजेरी आहे. धरणाची दुपारी ३ वाजता पाणी पातळी ३४७.३७ फूट होती. गेट खुले होण्यासाठी अजून ०.१३ ने पाणी पातळी कमी होती. एखादा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला की धरण भरले असे समजले जाते. ३४७.५० वर पाणी आले की ही स्थिती येते. हा प्रसंग होण्यासाठी केवळ दोन बोटे पाणी हवे होते. अशा वेळी पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने पातळी वाढली व पाठोपाठ दोन दरवाजे खुले झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा