![]() |
मानांक पाटील |
प्रा.डॉ.अरुण शिंदे,कोल्हापूर
■ उपचारासाठी मदतीची हाक ■
कोल्हापूर : "आई, मला खेळायचंय... मला पळता का येत नाही? माझा तोल का जातोय? पाय का अडखळतात? जिना का चढता येत नाही? " यांसारखे काळीज हेलावून टाकणारे प्रश्न आहेत आठ वर्षाच्या मानांक नावाच्या निरागस मुलाचे ! आपल्या चिमुकल्या बाळाच्या अशा प्रश्नांची उत्तरे देताना त्याच्या आई-वडिलांच्या काळजाचा थरकाप होतो...
खरेतर मानांकचे वय खेळण्या-बागडण्याचे, दंगामस्ती करण्याचे ! पण नियतीला हे पाहवले नाही त्याला या कोवळ्या वयातच डी एम डी (Duchenne Muscular Dystrophy ) हा गंभीर आजार झाला.या आजाराने त्याचे केवळ बालपणच नाही तर; भविष्य अंधकारमय केले आहे. या आजारावरील उपचारासाठी अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे. कोणाही मध्यमवर्गीय पालकांच्या आवाक्याबाहेरील ही रक्कम गोळा करण्यासाठी मानांकच्या आई-वडिलांनी समाजास आर्त साद घातली आहे. संवेदनशील व्यक्ती व संस्था यांनी यथाशक्ती मदत करून मानांकचे कोमेजणारे आयुष्य फुलवावे, अशी कळकळीची विनंती त्याच्या पालकांनी केली आहे .
कागल तालुक्यातील म्हाकवे येथील स्वाती व अभिजीत पाटील यांचा मानांक हा मुलगा. ज्येष्ठ साहित्यिक डॉ कृष्णा इंगोले (सांगोला ) यांचा नातू. गेल्या एक-दीड वर्षापासून मानांकच्या पायाचे स्नायू आकुंचन पावत आहेत. तो पळताना अचानक पडतो. चालताना तोल जातो. जिना चढताना गुडघ्यावर हात द्यावा लागतो. तो सहजपणे चालू, पळू शकत नाही. त्यास सायकल मारता येत नाही. पालकांनी त्याला डॉक्टरांकडे दाखविले परंतु त्याच्या स्नायूंची शक्ती क्षीण होत चालली. बेंगलोरच्या डिस्ट्रॉफी अनिहिलेशन रिसर्च ट्रस्टने अनेक चाचण्या करून मानांक ला डी. एम. डी. हा अत्यंत दुर्मिळ आजार झाला असल्याचे निदान केले. हा आजार पन्नास हजारांमध्ये एखाद्याला होतो. या आजारामुळे शरीरातील स्नायूंची शक्ती क्षीण होत जाते. स्नायू आकुंचन पावतात. व्यक्तीस पुढे हालचाली करता येत नाही. शेवटी अंथरुणाला खिळून राहावे लागते.
या दुर्धर व गंभीर आजारातून आपल्या बाळाला वाचविण्यासाठी स्वाती पाटील यांची धडपड सुरू आहे. डी. एम. डी. या आजारावरील औषध परदेशातून मागवावे लागते. उपचारासाठीचा खर्च अडीच कोटी रुपये आहे. एवढी प्रचंड रक्कम उभी करणे अशक्यप्राय झाल्याने पाटील कुटुंबीयांनी समाजाच्या दातृत्वाला साद घातली आहे. इम्पॅक्टगुरू या क्राउड फंडिंग प्लेटफार्मच्या माध्यमातून निधी संकलनाचे काम सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये अकरा लाख रुपये जमा झाले आहेत परंतु अद्याप खूप मोठ्या निधीची आवश्यकता आहे. ही देणगी आयकरातून सवलतीस पात्र आहे. तरी संवेदनशील व्यक्ती, संस्था, संघटना यांनी सढळ हाताने अर्थसहाय्य करावे, असे आवाहन स्वाती पाटील यांनी केले आहे.
आपली मदत एका छोट्या बाळाचे अमूल्य आयुष्य फुलवेल ! आपली एक देणगी त्याच्या चेहऱ्यावर हास्य व आयुष्यात आनंद निर्माण करेल !
*देणगी देण्यासाठी तपशील* -
*गुगल पे / फोन पे साठी मोबाईल नंबर* (स्वाती पाटील-)8275302966
*मदतीसाठी बँक खाते क्रमांक* - 700701717190354
( शाखा -अंधेरी इस्ट )
*खातेदाराचे नाव* - मानांकराजे पाटील
IFC code : YESB0CMSNOC
( टीप - Bनंतर शून्य व N नंतर ओ )
*Donate Here:* http://impactguru.com/s/enBIVb
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा