Breaking

गुरुवार, २२ जुलै, २०२१

रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हणकर व सचिवपदी लिमये यांची निवड

 

प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हणकर


प्रा.मनोहर कोरे : सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी


    सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या अध्यक्षपदी विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ताम्हणकर व सचिवपदी सलिल लिमये यांची निवड करण्यात आली.

      विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथील विद्यमान प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हणकर यांची रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून सांगली येथे झालेल्या समारंभामध्ये त्यांनी नूतन पदभार स्वीकारला. प्राचार्य ताम्हणकर हे सांगलीला सुपरिचित असणारे असे व्यक्तिमत्व आहे. समाजोपयोगी अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. नाट्यपंढरी सांगलीच्या साहित्यिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात नित्य कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्राचार्य ताम्हणकर यांच्याकडे पाहिले जाते.

      प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी विलिंग्डन महाविद्यालयाला एक नवी ओळख प्राप्त करून दिलेली आहे. विद्यापीठ परिक्षेत्रात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडलेल्या आहेत. रोटरीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची रोटरी क्लब ऑफ सांगलीच्या अध्यक्षपदी अभिनंदनीय निवड झालेली आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांमधून त्यांचे या निमित्ताने अभिनंदन होत आहे.

         तसेच सचिवपदी सीए सलील लिमये यांच तर समीर गाडगीळ यांची खजिनदार म्हणून निवड झाली आहे. या नूतन पदाधिकाऱ्यांनी एका समारंभात पदभार स्वीकारला.माजी अध्यक्ष अविनाश पोतदार समारंभाचे प्रमुख पाहुणे होते त्यांनी दृक्श्राव्य पद्धतीने मार्गदर्शन केले. अजय शहा, प्रमोद पाटील,सचिन कोले, अमोल कुलकर्णी, मनीष मराठे, डॉ.अभिजीत उदगावकर, गिरीश तंगडी विपुल शहा, अखिल सामाणी,यशांक गोकाणी,डॉ. अभिजीत लेंडवे हे सदस्य म्हणून काम पाहतील. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड, व्यंकटेश देशपांडे,नासीर बोरसादवाला यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

       यावेळी सनतकुमार आरवाडे, रविकिरण कुलकर्णी, सुरेश पाटील, संजय सोनवणे, किशोर शहा, निखिल शहा, रामकृष्ण चितळे,उदय पाटील बिपिन शेवडे ,अशोक सावंत व विजय बजाज हे मान्यवर उपस्थित होते. या सुंदर अशा कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ. सुहास जोशी यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम आभार प्रदर्शन सलील कुलकर्णी यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा