हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर: शियेत तृतीयपंथीयाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर मयत व्यक्तीच्या घरातील सोन्याचे दागिने गायब झाले आहेत तसेच दाराला बाहेरून कडी होती.त्यामुळे या हा मृत्यू नैसर्गिक की घातपात असा प्रश्न उपस्थित होत आहे.सतीश हैबतराव पवार ऊर्फ देवमामा ( वय ४२, सध्या रा. रामनगर, शिये, मूळगाव हुपरी, ता. हातकणंगले ) असे तृतीयपंथी व्यक्तीचे नाव आहे. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थाळाचा पंचनामा करुन तपास करीत आहेत.
या घटनेने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा