Breaking

शनिवार, २४ जुलै, २०२१

*ढगफुटी म्हणजे काय?*



जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) व्याख्येनुसार कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी म्हणजे ‘क्लाऊडबस्ट’ होय. १५ मिनिटांत २५ मिलिमीटर किंवा एक इंच किंवा ३० मिनिटांत ५० मिलिमीटर किंवा दोन इंच किंवा ४५ मिनिटांत ३ इंच किंवा ७५ मिलिमीटर किंवा एक तासाच्या कालावधीत १०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षाही अधिक दराचा पाऊस म्हणजे ढगफुटी होय. ढगफुटींचा पाऊस कधीच २४ तास पडत नाही. मान्सूनपूर्व किंवा मान्सून पश्‍चातच्या काळात अस्थिर वातावरणात क्युमुलोनिंबस ढगांमुळे मुख्यत्वे ढगफुटी होते. मान्सून स्थिर झाला की वातावरण स्थिर होते म्हणून मान्सूनमध्ये ढगफुटी होत नाहीत हे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्‍त विज्ञान आहे. अद्याप मान्सून येऊन स्थिर होणे बाकी आहे हे देखील यातून स्पष्ट होते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा