रोहित जाधव: शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी
काही दिवसाच्या जोरदार पावसामुळे वारणा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात पात्राबाहेर पसरत आहे त्यामुळे वारणा नदीने जणू रुद्रावतार च धारण केला असल्याची प्रचिती आली आहे. परिणामी हातकणंगले तालुक्यातील खोची गावाला महापुराचा चांगलाच धक्का बसला आहे त्यामुळे अनेक घरे पाण्याखाली जाऊन घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाले असून सुमारे दोनशे पेक्षा जास्त कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.वारणा नदीचे पाणी शुक्रवारी सकाळपासून येण्यास सुरुवात झाली नदीच्या पाणी पातळीत दिवसभर झपाट्याने वाढ होत असताना गावातील गणपती मंदिर परिसर , नाईक गल्ली परिसर, चर्मकार समाज परिसरात सुरुवातीला पाणी शिरले तर रात्रीत पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होऊन वाघ गल्ली, दाढ मोडे गल्ली, नाईक गल्ली, भोई गल्ली, या परिसरात रात्री पाणी शिरले शनिवारी पहाटे पाणी झपाट्याने वाढून तालीम संघ गजानन मंडळ व दसरा चौक या परिसरात पाणी शिरले त्यामुळे गावातील अनेक लोकांची तारांबळ उडाली. पूर बाधित लोकांचे स्थलांतर मराठी शाळा व गावातील हायस्कूल याठिकाणी करण्यात आलेले आहे पूर बाधित झालेल्या कुटुंबियांना शासनाकडून काही नुकसानभरपाई मदत मिळणार काय याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा