हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूरच्या नाईट लँडिंग चा विषय अवघ्या काही तासातच संसदेमध्ये येणार आहे. हा विषय मार्गी लागावा म्हणून नागरी हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यासंदर्भात ठोस पावले उचलणार आहेत.
त्यामुळे येत्या काही दिवसात कोल्हापूरचा नाईट लँडिंगचा प्रश्न लवकरच मार्गी लागू शकतो.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर नाईट लँडिंगच्या संदर्भात असलेले अडथळे त्यासंदर्भात उपाय याचा अहवाल भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने मागितला आहे.कोल्हापूर विमानतळाच्या ०७ म्हणजेच पश्चिमेकडील बाजूस विमान लँडिंग करण्यासाठी मोठे अडथळे आहेत. ३ पॉवर ग्रेड, ३ टेलिकॉम टॉवर तसेच वैभव सोसायटीमधील काही बंगले अडथळे ठरत आहेत डीजीसीएच्या नियमानुसार ह्या अडचणी दूर होणे गरजेचे आहे.
त्यामुळे भविष्यात मोठे विमान उतरवण्यासाठी अडथळे आणि उपाय योजना करणे गरजेचे आहे. तर २५ म्हणजेच मुडशिंगीकडील बाजू सद्यस्थितीला विमान उतरून नाईट लँडिंगचा प्रश्न मार्गी लागू शकतो. या बाजूला बहुतांशी अडथळे नसले तरी महावितरणची जाणारी तार दोन किलोमीटर दूर हटवणे गरजेचे आहे. तरच त्या बाजूने नाईट लँडिंग विमान उतरू शकते.
जागेचा प्रश्न प्रलंबित
गड मुडशिंगीकडील ६४ एकर जागे बरोबरच तामगाव हद्दीतील १.७ एकर जमीन संपादित करणे गरजेचे आहे. तरच या विषयाला चालना मिळू शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा