Breaking

बुधवार, २८ जुलै, २०२१

*आनंदवार्ता!कोल्हापूर राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद*

 


हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी


 कोल्हापूर :राधानगरी तालुक्यात तुरळक पडणाऱ्या सरी वगळता पावसाने उसंत घेतली. राधानगरी धरणक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.

आज (दि. २८) पाच क्रमांकाचा दरवाजा ३ वाजून २५ मीनिटांनी बंद झाला. दरम्यान, फक्त ‘बीओटी’मधून १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

दूधगंगा, तुळशी जलाशयातून कमी प्रमाणात विसर्ग झाल्याने नदीची पाणीपातळी कमी होत आहे. पाणी ओसरल्याने तालुक्यातील वाहतुकीचे सर्व मार्ग खुले झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा