प्रविणकुमार माने : उपसंपादक
भारतीय दंड संहिता 1860(45 of 1860) मधील कलम 375 मध्ये बलात्कार या गुन्ह्याची व्याख्या केलेली आहे.तर कलम 376 मध्ये बलात्काराच्या गुन्हयासाठी शिक्षेची तरतूद केली आहे. या कलम 375 च्या व्याख्येप्रमाणे एखाद्या महिलेसोबत संमतीने ठेवलेल्या शरीरसंबंधास बलात्कार या संज्ञेतून वगळण्यात आले आहे.
सध्याच्या काळात मल्टिमीडिया, व्हॉट्सऍप ,फेसबुक व इ-मेल सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे महिला व पुरुष यांच्यामधील प्रेमप्रकरणात झपाट्याने वाढ झालेचे दिसून येत आहे. अशातच कोणी कोर्ट मॅरेज करत तर कोणी घरातून पळून जातात. परिणामी त्यांच्यामध्ये नकळतच शरीरसंबंध प्रस्थापित होतात.
परंतु त्यांच्यातील वैचारिक मतभेदामुळे व वादविवादांमुळे त्यांचे प्रेमाचे नाते संबंध संपुष्टात येते अशी उदाहरणे धक्कादायक असली तरी त्यात आश्चर्यकारक काहीही नाही. तथापि महिला ही तिच्या आर्थिक वा सामाजिक हव्यासापोटी त्या पुरूष विरूद्ध बलात्काराची तक्रार दाखल करते. अशा पुरूषांना बलात्काराच्या गुन्हयासाठी कायदेशीर खटल्यास सामोरे जावे लागते. परंतु मा.उच्च न्यायालयाने परस्पर संमतीने ठेवलेल्या शरीरसंबंधाबाबत दिलासादायक निर्णय दिलेला आहे. मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी अक्षय जयसिंघानी विरुद्ध महाराष्ट्र शासन या अटकपूर्व जामीन प्रकरणात "परस्पर संमतीने ठेवलेल्या शरीरसंबंधास बलात्कार वा फसवणूक केली असे म्हणता येणार नाही "असा महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. अशा प्रकारच्या निर्णयामधे सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्यामुळे आता परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा