Breaking

सोमवार, २६ जुलै, २०२१

मातोश्री सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक भान राखत कोथळी येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत

 


प्रा.मेहबूब मुजावर : जैनापूर प्रतिनिधी 


  कोथळी : मातोश्री सोशल फाउंडेशनच्या वतीने कोथळी येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली.कोथळी येथील पूरग्रस्तांना महापूर आल्यामुळे लोकांचे अतोनात हाल होत असताना लोकांची राहण्याची तसेच खाण्याची खूप मोठ्या प्रमाणावर समस्या होत होती. सदर  गरज ओळखून मातोश्री सोशल फाउंडेशने कोथळी येथील पूरग्रस्तांना एक छोटीशी मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. याठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातोश्री सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य हे स्वतः पूरग्रस्त असून देखील आपल्या वतीने एक मदत म्हणून कोथळी येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा परवठा करण्यात आला. 



    यावेळी मातोश्री सोशल फाऊंडेशने दिलेल्या मदतीची पूरग्रस्तांच्या कडून प्रशंसा करत मातोश्री या NGO चे आभार पूरग्रस्तांनी मांडले. 

   यावेळी मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन आवळे यांनी पूरग्रस्तांना सर्व परी मदत करण्याचे आश्वासन दिले.या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमोल बरकडे, सचिव सुशांत चुडाप्पा , खजिनदार रमेश घाटगे, सदस्य किसन भोसले, विठ्ठल गुदळे, शहाजी बिरंणजे, रोहन पाटोळे, तेजस घाटगे, सर्जेराव वायदंडे, निखिल नंदीवाले, सुनिता घोलप सुरेखा बिरंणजे राजू तिवडे इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा