Breaking

शुक्रवार, २ जुलै, २०२१

चिपरीतील शानदार आवळे यांनी दाखवून दिला प्रामाणिकपणा



शिरोळ तालुका प्रतिनिधी - रोहित जाधव


              चिपरी ता. शिरोळ येथील शानदार प्रकाश आवळे वय वर्ष 28 हा आज आपल्या मोटारसायकल वरून  सकाळी 9-30 च्या दरम्यान चिपरीहुन जयसिंगपूर दिपनगर मधुन जात असताना रस्ताकडेला एक अनोळखी पाकीट आढळून आले.सदर पाकीट आवळे यांनी ताब्यात घेऊन त्यांचा पत्रकार मित्र अजय सदामते यांना सदर पाकीटबाबतची हकीकत फोनवरून  सांगितली व त्यानंतर अजय सदामते यांनी सदर पाकीट जयसिंगपुर पोलीस ठाणे येथे जमा करावे म्हणुन सांगितले त्यानंतर सदर पाकीट घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे नेऊन जयसिंगपुर पोलीस ठाणेचे  पोलीस गुलाब सनदी यांना पाकिट बाबतची माहिती दिली. त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाणेचे कर्तव्यदक्ष पोलीस गुलाब सनदी यांनी अर्धा तासात पाकीट मालकांचा शोध घेतला.  सदर पाकिट मालक नेहाल सिंकदर नदाफ 11 वी गल्ली जयसिंगपूर भाजी मंडई यांना ओळख व माहिती विचारून सदर पाकिट शानदार आवळे यांच्या हस्ते नदाफ यांच्या ताब्यांत   देण्यात आले.

   यावेळी आवळे यांना योग्य ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. आजच्या काळाची प्रामाणिकपणा व माणुसकी जिवंत आहे हे शानदार आवळे यांनी दाखवून दिले आहे.

      त्यांच्या या कार्याचा सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा