Breaking

गुरुवार, २२ जुलै, २०२१

शिरोळ तालुक्यात एन.डी.आर.एफ.(NDRF)च्या टीमचे आगमन : आपत्ती व्यवस्थापन समिती सज्ज"

 

एन डी आर एफ ची टीम


मालोजीराव माने : कार्यकारी संपादक


शिरोळ : शिरोळ तालुक्यात एन.डी.आर.एफ.(NDRF)च्या एका टीमचे आगमन झालेले आहे. सदर टीमचे शिरोळ तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

    दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पाणलोट क्षेत्रात प्रचंड मुसळधार पाऊस पडत असल्याने व  शिरोळ तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा व  कृष्णा  या नद्यांची पात्रे तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे वेळीच आपत्ती निर्माण होऊ नये यासाठी म्हणून शासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी दोन एन डी आर एफ ची पथके पाठवली आहेत त्यापैकी एक पथक शिरोळ तालुक्यात दाखल झाले आहे. त्या पथकांमध्ये २१ जवान असून या टीमचे प्रमुख मा.शिवप्रसाद राव असून ही टीम राष्ट्रीय सेवाकार्य करण्यास तत्पर आहे.

       शिरोळ तालुका तहसीलदार मा.डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल ऑफिसर नायब तहसीलदार मा.संजय काटकर सदर संभाव्य पूरपरिस्थितीवर नजर ठेवून आहेत.  शिरोळ तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती या एन.डी.आर. एफ.(NDRF) जवानांच्या टीमसह सज्ज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा